क्रिएटिव्ह फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम, औसा मतदारसंघात महिला सक्षमीकरण व समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार.
महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त औसा विधानसभा मतदारसंघात आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान भगिनींचा सन्मान आणि संवाद सोहळा बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) बेलकुंड येथील विशाल मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात सुमारे १५० महिलांना साड्यांचे वाटप करून…









