महाराष्ट्र खाकी ( हिंगोली / विवेक जगताप ) – पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखायची सोडून थेट लाचखोरीचा बडगा उगारल्याची संतापजनक घटना हिंगोली जिल्ह्यात समोर आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार राहुल वसंत मैदकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खाकी वर्दीला लागलेल्या या डागामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. – पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखायची सोडून थेट लाचखोरीचा बडगा उगारल्याची संतापजनक घटना हिंगोली जिल्ह्यात समोर आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार राहुल वसंत मैदकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खाकी वर्दीला लागलेल्या या डागामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३८ वर्षीय मजूर असून ते कडोळी (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील रहिवासी आहेत. तक्रारदारावर गोरेगाव पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात चॅप्टर केसवेळी जामीन मिळवून देण्यासाठी आणि पुढील कारवाईत दमदाटी करत कडक प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी आरोपी हवालदार राहुल मैदकर याने सुरुवातीला चक्क ४,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) हिंगोली युनिटकडे रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष लाचेची पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान आरोपी हवालदाराने तडजोडीअंती ३,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचला. गोरेगाव ते हिंगोली जाणारा रोडवर पंचांसमक्ष आरोपी हवालदार राहुल मैदकर याने तक्रारदाराकडून ३,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वतःच्या हाताने स्विकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरा ११ वाजून ४३ मिनिटांनी आरोपी हवालदार राहुल वसंत मैदकर यास अटक करण्यात आली आहे.
हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधक्षक विकास घनवट, पोलीस निरीक्षक नानलू मलपिल्लू तसेच सापळा पथकातील अंमलदार राजाराम फुपाटे, गजानन पवार, विनोद पुंडगे, शिवाजी वाघ आणि शेख अकबर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




