गोशाळेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक न्यायालयाचे आदेश धुडकावून पाच बैल गहाण ठेवणाऱ्या व्यवस्थापनाला कुलदीप सूर्यवंशी, नेहरू देशमुख आणि पोलिसांनी दिला चांगलाच धडा
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – स्वतःच्या मालकीचे बैल असतानाही न्यायालयाचे आदेश हातात घेऊन महिनोन्महिने गोशाळेच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागणाऱ्या दोन शेतकऱ्यांच्या व्यथेने एकदा फिरकी उडवली आहे. परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेने न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाला साफ नाकारत शेतकऱ्यांच्या पाच बैलांना गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेणापूर तालुक्यातील…









