Home » पोलीस » SP अमोल तांबे यांच्या नेतृत्वात एका वर्षात एकूण २७ प्रकरणांमध्ये ३८ आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपारिच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट

SP अमोल तांबे यांच्या नेतृत्वात एका वर्षात एकूण २७ प्रकरणांमध्ये ३८ आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपारिच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट

महाराष्ट्र खाकी (लातूर/ विवेक जगताप) – लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बुलडोझर चालवत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा सिलसिला सुरू केला आहे. गेल्या एका वर्षात एकूण २७ प्रकरणांमध्ये ३८ आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वातावरणात लक्षणीय घट झाली असून, वारंवार गुन्हे करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच प्रत्येक गुन्ह्यात कठोर, तातडीची आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले.

जामिनावर सुटलेले, बंधपत्र मोडणारे आणि सराईत आरोपींना नोटीस, अटक, प्रतिबंधात्मक कारवाई आणि हद्दपारीचा भस्मासुर दाखवला जात आहे. “एकही पात्र आरोपी प्रतिबंधात्मक कारवाईपासून वंचित राहू नये”, या भूमिकेतून तांबे सातत्याने आढावा घेत आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत थरारक कारवाई:

कलम ५५ अन्वये: ४ प्रकरणांमध्ये १५ आरोपी हद्दपार

कलम ५६ अन्वये: १३ प्रकरणांमध्ये १३ आरोपी हद्दपार

कलम ५७ अन्वये: १० प्रकरणांमध्ये १० आरोपी हद्दपार

एकूण २७ प्रकरणे – ३८ आरोपी जिल्ह्याबाहेर! या मोहिमेमुळे लातूर जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक बसला आहे.

अनेक सराईत आरोपींविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पोलीस दल आता टोळ्या, समाजविघातक तत्त्वे आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर आणखी आक्रमक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, “सराईत गुन्हेगार, टोळ्या आणि समाजद्रोही प्रवृत्तीच्या लोकांना लातूरमध्ये आता काहीही सहन केले जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्या प्रत्येकाला कायद्याची जाणीव करून दिली जाईल. नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.” लातूरकर नागरिक या आक्रमक कारवाईचे स्वागत करत आहेत. जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. लातूर पोलिसांची ही ‘झीरो टॉलरन्स’ नीती खरोखरच गुन्हेगारांसाठी इशारा ठरली आहे

Share This News

Related Post

National