सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे लातूर मनपा कर्मचारी वेठीस; ७३ कोटींच्या थकबाकीसाठी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा आक्रमक एल्गार
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप)- सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर रस्त्यावर उतरण्याची नामुष्की ओढवली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार निवेदने देऊनही मागण्यांची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाला माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रत्यक्ष…









