Home » महाराष्ट्र » Pimpri – chinchvad कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखालील तिरंगा रॅलीत आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीती, महिलांचा लक्षवेधी सहभाग

Pimpri – chinchvad कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखालील तिरंगा रॅलीत आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीती, महिलांचा लक्षवेधी सहभाग

महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न, कामगार नेते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष  यशवंतभाऊ भोसले  यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम नगर येथे भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली, भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे , सदाशिव खाडे, प्रशांत शितोळे, अजीज भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने हातात तिरंगा घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते. वयाची तमा न बाळगता ज्येष्ठ महिलांनीही ५ ते ६ किलोमीटर पायी चालत देशभक्तीचा अनोखा संदेश दिला. संत तुकाराम नगर येथील श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून सुरू झालेली रॅली पंचशील बुद्ध विहार, मैत्री चौक, वायसीएम हॉस्पिटल, वल्लभनगर मार्गे विविध चौका मधून पुन्हा श्रमिक आघाडीच्या कार्यालयाजवळ येऊन सभेत रूपांतरित झाली.

रॅलीची वैशिष्ट्ये व मान्यवरांचे मनोगत
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन पिढीत देशप्रेम आणि बलिदानाची जाणीव निर्माण करण्यासाठी या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.” — यशवंतभाऊ भोसले (कामगार नेते)
देशभक्तीचे वातावरण – स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे आणि नागरिकांच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
महिलांचा विशेष सहभाग – रॅलीमध्ये महिलांचा लक्षवेधी सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात देशभक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
संयोजकांचे योगदान
या यशस्वी रॅलीचे संयोजन मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे, ज्ञानेश्वर (माऊली) थोरात, नंदू आप्पा कदम, किरण सुवर्ण, जयदेव अक्कलकोटे, मुन्ना बाविस्कर, उद्योजक दीपक शेठ पाटील, दिनेश पाटील, राहुल शितोळे, दत्ता गायकवाड, अमोल घोरपडे, राहुल खाडे, संतोष दुबे, विजय दळवी, मनीष अमोलिक, प्रभजोत सिंगहंस आदींनी केले.

Share This News

Related Post

National