SP अमोल तांबे यांच्या नेतृत्वात एका वर्षात एकूण २७ प्रकरणांमध्ये ३८ आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपारिच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट
महाराष्ट्र खाकी (लातूर/ विवेक जगताप) – लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बुलडोझर चालवत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा सिलसिला सुरू केला आहे. गेल्या एका वर्षात एकूण २७ प्रकरणांमध्ये ३८ आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वातावरणात लक्षणीय घट झाली असून, वारंवार गुन्हे करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे….









