Home » महाराष्ट्र » NEET पेपर लीक प्रकरणातील आरोपी मोटेगावकरचे RCC क्लासेस आणि डॉ. शिरूरेचे हॉस्पिटल सील करा आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करा – सामाजिक कार्यकर्ते सतीश करंडे

NEET पेपर लीक प्रकरणातील आरोपी मोटेगावकरचे RCC क्लासेस आणि डॉ. शिरूरेचे हॉस्पिटल सील करा आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करा – सामाजिक कार्यकर्ते सतीश करंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर /विवेक जगताप) – देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर लीक प्रकरणाच्या  मुळाशी असणाऱ्या लातूरमधील आरोपिंच्या RCC क्लासेस आणि डॉ. शिरूरे यांचे हॉस्पिटलवर प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी लातूरचे लढाऊ सामाजिक कार्यकर्ते सतीश करंडे  यांनी  रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला लातूर मधील विविध चळवळींमधील सहकारी आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला असून, प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उपोषणकर्ते सतीश करंडे यांच्या प्रमुख मागण्या
1) RCC क्लासेसवर तात्काळ बंदी आणा: NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या शिवराज मोटेगावकर याचे  ‘RCC क्लासेस’ तात्काळ सील करण्यात यावेत.
2) डॉ. शिरूरे यांच्या हॉस्पिटलवर तातडीने कारवाई: या प्रकरणात संशयित असणाऱ्या **डॉ. शिरूरे यांचे हॉस्पिटल** तात्काळ सील करून परवाना रद्द करण्यात यावा.
3) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा घात करणाऱ्या या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा (307/304) गुन्हा दाखल करण्यात यावा.
4) आरोपींकडूनच खर्च वसूल करा: शासनाला आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास देऊन दुसऱ्यांदा घ्यावी लागलेली परीक्षा, याचा **संपूर्ण आर्थिक खर्च संबंधित दोषी आरोपींकडूनच वसूल करण्यात यावा.

प्रशासनाची निद्रा कधी उडणार? लातूरकरांचे लक्ष
लातूरमधील शिक्षण सम्राटांची मुजोरी आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या राजकीय वरदहस्तामुळे सामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे. सतीश करंडे यांच्या या आमरण उपोषणाने लातूरच्या प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. पेपर लीकसारख्या गंभीर गुन्ह्यात सामील असणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर शासन कधी कारवाई करणार? आणि प्रशासन या आक्रमक आंदोलनाची नेमकी काय दखल घेणार? याकडे आता लातूरसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे! जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Share This News

Related Post

National