महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – आदित्य शिवराज मोटेगावकरला दोन वर्षांची NEET परीक्षा बंदी NTA ची मोठी कारवाई, मोटेगावकर कुटुंबाला दुसरा धक्का लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस चालक शिवराज मोटेगावकर यांच्या कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यावेळी थेट त्याच्या मुलावर कारवाई झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने आदित्य मोटेगावकर यांची NEET UG 2026 ची उमेदवारी रद्द केली आहे. इतकेच नव्हे, तर NEET UG 2027 ची परीक्षा देण्यासाठीही त्यांना अपात्र ठरवले आहे. म्हणजे दोन वर्षांसाठी नीट परीक्षेतून बंदी केली आहे.
३ मे २०२६ च्या नीट पेपर लीक प्रकरणात आदित्य याच्यावर प्रश्नपत्रिका मिळवणे किंवा शेअर करण्याचा आरोप होता. NTA ने जुलैमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली. आदित्य याने आरोप फेटाळले, पण CBI ने १७ सप्टेंबरला NTA ला पत्र पाठवून स्पष्ट लिहिले की – आदित्य पेपर लीक प्रकरणातील लाभार्थी आहे. NTA च्या Unfair Means (UFM) समितीने सर्व पुरावे, CBI ची माहिती आणि कागदपत्रे तपासली आणि अंतिम कारवाई केली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार ही कारवाई झाल्याचे NTA च्या पत्रात स्पष्ट केले आहे.
शिवराज मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये रसायनशास्त्राच्या १३२ हस्तलिखित प्रश्नांच्या प्रतिमा सापडल्या होत्या. त्यापैकी सुमारे १११ प्रश्न NTA च्या मास्टर सेटशी जुळले होते. CBI च्या म्हणण्यानुसार, आदित्य सहआरोपी P.V. कुलकर्णी यांच्या विशेष वर्गांना उपस्थित होते आणि तिथे कथित लीक प्रश्न मिळाले. शिवराज मोटेगावकर CBI च्या कोठडीत, मुलाला आदित्य ला दोन वर्षांची नीट बंदी – मोटेगावकर कुटुंबासाठी ही दुहेरी फटका ठरली आहे.




