Home » महाराष्ट्र » Latur police पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या योग्य नियोजनामुळे लातूर जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात व शांततेत संपन्न

Latur police पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या योग्य नियोजनामुळे लातूर जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात व शांततेत संपन्न

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे व्यापक व काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात बंदोबस्ताची तगडी यंत्रणा राबविण्यात आली. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ अप्पर पोलीस अधीक्षक, १ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ८० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच १० नवप्रविष्ट पोलीस उपनिरीक्षक, असे एकूण १२१ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. याशिवाय १३७० पोलीस अंमलदार, १०० प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार आणि १०४० होमगार्ड यांचीही बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच राज्य राखीव पोलीस दलाची १ तुकडी आणि शीघ्र कृती दलाच्या ४ तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या.

प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात आवश्यक बदल, पर्यायी मार्गाची व्यवस्था आणि मिरवणूक मार्गावरील वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे करण्यात आले. मिरवणुकीचा निर्धारित मार्ग व वेळ, ध्वनिक्षेपक वापराबाबतचे नियम तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते, ज्याला लातूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे लातूर जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय शांततापूर्ण आणि सुरक्षित पार पडली.

Share This News

Related Post

National