NEET पेपर लीक प्रकरणातील आरोपी मोटेगावकरचे RCC क्लासेस आणि डॉ. शिरूरेचे हॉस्पिटल सील करा आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करा – सामाजिक कार्यकर्ते सतीश करंडे
महाराष्ट्र खाकी (लातूर /विवेक जगताप) – देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर लीक प्रकरणाच्या मुळाशी असणाऱ्या लातूरमधील आरोपिंच्या RCC क्लासेस आणि डॉ. शिरूरे यांचे हॉस्पिटलवर प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी लातूरचे लढाऊ सामाजिक कार्यकर्ते सतीश करंडे यांनी रविवार, ९ ऑगस्ट रोजी…
