Home » महाराष्ट्र » पिंपरी-चिंचवड राजकीय प्रयोगाचे मैदान नाही, मृतांच्या दुःखावर राजकारण नको”आमदार रोहित पवारांच्या आरोपांवर राजाभाऊ दुर्गे आक्रमक

पिंपरी-चिंचवड राजकीय प्रयोगाचे मैदान नाही, मृतांच्या दुःखावर राजकारण नको”आमदार रोहित पवारांच्या आरोपांवर राजाभाऊ दुर्गे आक्रमक

महाराष्ट्र खाकी (पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणावर भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूवर राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत, असा इशारा देतानाच भाजपने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या दुर्घटनेचे राजकीय भांडवल करण्याऐवजी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, वस्तुनिष्ठ चौकशी करणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड जिल्हा मुख्य प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी म्हटले आहे.

मृतांच्या दुःखावर राजकारण नको – राजाभाऊ दुर्गे
मोशी येथील दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात पक्ष पूर्णपणे सहभागी आहे. महापालिक tकडून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दुःखावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे, जो अत्यंत निंदनीय आहे.
दुर्घटना घडल्यानंतर चौकशीची मागणी करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु पुराव्यांशिवाय भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर वारंवार आरोप करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही , असा सज्जड दम दुर्गे यांनी दिला. आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, “पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींवर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रांसह बोलावे. केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आरोप झाल्यास, त्याला जशास तसे आणि तथ्यांच्या आधारे चोख प्रत्युत्तर दिले जाईल.”

“पिंपरी-चिंचवड हे राजकीय प्रयोगाचे मैदान नाही”
पिंपरी-चिंचवड शहर हे कोणाच्याही वैयक्तिक राजकीय प्रयोगाचे मैदान नाही. येथील प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आणि केवळ शहरातील जनतेचा आहे. जनतेने सलग दुसऱ्यांदा भाजपवर विश्वास दाखवून सत्ता दिली असून, या जनादेशाचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे ठणकावून सांगण्यात आले.
कचरा व्यवस्थापनावर कायमस्वरूपी उपायांची मागणी
आज शहरासमोर कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या संवेदनशील प्रश्नावर राजकीय श्रेयवाद खेळण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विधायक चर्चा करणे आणि कायमस्वरूपी उपाय शोधणे काळाची गरज आहे. प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून यंत्रणा अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी कठोर निर्णय घेतले जावेत, अशी आक्रमक मागणीही भाजपने केली आहे.

“राजकारण करायचे असेल तर विकासाच्या मुद्यांवर करा; मात्र मृतांच्या दुःखावर राजकारण करू नका. शहराच्या स्थापनेपासून कचरा समस्येवर कोण-कोणत्या उपाययोजना केल्या, याचे आत्मचिंतन विरोधकांनी करावे.”
        — राजाभाऊ दुर्गे, मुख्य प्रवक्ते, भाजप पिंपरी-चिंचवड

Share This News

Related Post

National