महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांच्या भेटीनंतर थेट विधानपरिषदेचे नवनिर्वाचित भाजप आमदार बस्वराज पाटील यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीत आयुक्तांनी पाटील यांच्या विधानपरिषद निवडणूक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर लातूर मध्ये एक चर्चा जोर धरतं आहे ती म्हणजे बस्वराज पाटील यांना उमेदवारी मिळाली ती आमदार अभिमन्यू पवार यांच्या वकिलीमुळे असे आमदार पवारांनी स्वतः उमरगा येथील एका भर सभेत सांगितले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळजातले आणि शॅडो मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा पुण्यातील सारथी कार्यक्रमातील खासदार मेधा कुलकर्णी याच्या सोबतच्या बसण्यावरून झालेल्या वादानंतर लातूर जिल्ह्याच्या प्रशासनात तीन मोठया अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या!, पण त्या तीन अधिकाऱ्यांमधील एक असलेले लातूर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली होती त्या नंतर आता राहुल कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या वकिलीमुळे विधानपरिषदेत आमदार झालेले बस्वराज पाटील यांची विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. मागील काही वर्षांपासून आमदार अभिमन्यू पवार यांचे राजकारणातील आणि प्रशासनातील वजन वाढले असल्याचे लातूर जिल्ह्यात नाही तर राज्यात दिसत आहे,
याचे उदाहरण म्हणजे भर विधानसभेत एका आमदाराने आमदार अभिमन्यू पवार यांना शॅडो मुख्यमंत्री असे म्हणले होते. लातूर जिल्ह्यातील प्रशासनात चांगली पकड निर्माण केलेले आमदार पवार हे ठरवतात कोणता अधिकारी कुठं असला पाहिजे, लातूर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी आमदार बस्वराज पाटील यांची भेट म्हणजे पुण्यात झालेल्या सारथी कार्यक्रमातील खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील वाद तर नाही ना ? कारण त्या वादानंतर लातूर जिल्ह्यातील मोठया पदाच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत आणि यात आमदार अभिमन्यू पवार यांचा कसलाच हस्तक्षेप नव्हता . पण आयुक्त राहुल कुलकर्णी यांची विधानपरिषदेचे नवनिर्वाचित भाजप आमदार बस्वराज पाटील यांच्याकडे जाऊन आमदारकीच्या शुभेच्छा देऊन सदिच्छा भेट दिली, यातून दोन गोष्टीची चर्चा होत आहे शॅडो मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले आणि लातूर जिल्ह्याच्या प्रशासनात वजन आसलेले आमदार अभिमन्यू पवार यांची आणखीन भेट नाही पण आमदार पवार यांच्या वकिली मुळे आमदार झालेले बस्वराज पाटील यांची भेट म्हणजे सारथी कार्यक्रमातील वादाचा परिणाम तर नाही ना ?
आयुक्तांसारख्या उच्च अधिकाऱ्याने एकाच कालावधीत विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनंतर सत्ताधारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदाराकडे जाणे हे तटस्थ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे! लातूरसारख्या संवेदनशील शहरात महापालिका आयुक्तांची अशी ‘दोन्ही बाजूंना भेट’ ही प्रशासन आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा पुसट करणारी वाटते. सकारात्मक चर्चा झाली असे म्हटले जात असले तरी, ही भेट केवळ शुभेच्छांपुरती मर्यादित होती की त्यामागे काही प्रशासकीय-राजकीय समीकरणे होती, याबाबत स्पष्टता नाही. आयुक्तांची ही दुहेरी भेट लातूरच्या राजकीय वातावरणात नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. यावेळी डॉ. पंजाबराव खानसोळे पाटील, प्रकाश आष्टे, बसवराज धाराशिवे, दिलीप भालेराव, अमृत पाटील, मधुसूदन पारेख आदी उपस्थित होते.




