निटूर ग्रां.पं.पाईप लाईन भ्रष्टाचार प्रकरण, चौकशी अहवालाचीच चौकशी करण्याची गरज.!

महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – निलंगा तालुक्यातील निटूर ग्रां. पं.च्या पाईप लाईन भ्रष्टाचाराचा अहवाल गटविकास अधिकारी कार्यालयात दाखल झाला नऊ रोड बाक्स गायब असल्याचा ठपका ही ठेवण्यात आला माञ पाईप कोणत्या कंपनीचे होते रेकाॕर्ड बुकला घेतलेल्या साहित्याची नोंद एक वर्षाने का केली केली व नऊ रोडबाक्स गायब तर वाॕल्व्ह बसविले का नाही या संदर्भात अहवालात काही ही

उल्लेख नसल्यामुळे या चौकशी अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निटूर ग्रां पं. ने शिंदे डेव्हलपर्स कडून घेतलेल्या साहित्यात भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यामध्ये केवळ नऊ रोडबाक्स गायब असल्याचे सांगण्यात आले आहे माञ याची चौकशी करणाऱ्यानी वरवरची चौकशी केली असून या प्रकरणात गांभीर्याने चौकशी करणे गरजेचे आहे. निटूर येथील

ग्रा.प.चा कारभार या ना त्या कारणांमुळे चर्चेत असतो शिंदे डेव्हलपर्सने इ. स. 2020 मध्ये पाईप लाईन, रोडबाक्स सहीत इतर साहीत्य ग्रां. पं.ला दिले माञ त्यामध्ये भृष्टाचार झाल्याची दोन तक्रारी पं.सं.निलंगा येथे सामाजिक कर्यकर्ते धम्मानंद काळे ,व पवार नामक दोघांनी गटविकास अधिकारी निलंगा येथे दिल्या त्यावरून विस्तार अधिकारी अंकूश बिराजदार व पाणी

पुरवठ्याचे अभियंता कुलकर्णी यांना संयुक्त चौकशी साठी नेमले माञ या दोघांनी ही चौकशी साठी दिड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला त्यामुळे या दोघांनाही चौकशी स विलंब म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली तेंव्हा कुठे हा चौकशी अहवाल वरीष्ठ कार्यालयात दाखल झाला. दरम्यान इ. स. 2020 साली शिंदे डेव्हलपर्स कडून मिळालेल्या साहित्याची रेकाॕर्ड बुक

ला नोंद तत्कालीन ग्रामसेवकाच्या सहिने करायला पाहिजे होती माञ ती नोंद झाली नाही त्याची नोंद विद्यमान ग्रामसेवकांनी एक वर्षानंतर आॕक्टोबर 2021 रोजी केली माञ त्याचा उल्लेख चौकशी अहवालात कराण्यात आला नाही . तसेच अहवालात नऊ रोडबाक्स गायब असल्याचा ठपका ठेवण्यात आला माञ जे रोडबाक्स वाॕल्व्ह वर बसवतात ते वाॕल्व्ह बसविल्या का

नाही त्या वाॕल्व्ह चा उल्लेख नाही तसेच शिंदे डेव्हलपर्स या कंपनीने साडेतीन हजार फूट पाईप लाईन व इतर साहित्य दिले ते कोणत्या कंपनीचे पाईप आहेत याचा साधा उल्लेख ही या चौकशी अहवालात करण्यात आला नाही त्यामुळे चौकशी झाली तीच संशयाच्या भोव-यात अडकली असून पुन्हा एकदा गंभीरपणे चौकशी होणे गरजेचे आहे .

निटूर ग्रां.पं.च्या भ्रष्टाचार प्रकरणात अंकुश बिराजदार व अभियंता कुलकर्णी हे दोघे चौकशी अधिकारी होते यातील अंकूश बिराजदार हे निलंगा पं. सं. ला विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते माञ हालसी तु. येथे शौचालय बांधले नसतानाही शौचालय बांधल्याचे प्रत्यक्षदर्शी अहवाल दिल्याने व खोटा अहवाल दिल्याने त्यांना नुकतेच मुख्यकार्यकारी अधिकारी लातूर यांनी निलंबित केले आहे .

Recent Posts