अबू आझमी चा बोलविता धनी RSS आहे. मताच्या धुर्वीकरणासाठी दंगलिची सुपारी घेतली आहे का ? – दिपक केदार

महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप ) –वारकरी बद्दल बोलणाऱ्या अबू आझमीचा बोलविता धनी RSS आहे. मताच्या धुर्वीकरणासाठी दंगलिची सुपारी घेतली आहे का? समाज कंटक म्हणून त्याच्यावर कार्यवाही करा अशी मागणी करत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी अबू आझमी यांच्यावर आरोप आणी कार्यवाहीची मागणी केली आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूर

वारीबाबत गरळ ओकल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्य सरकारमधील सत्ताधारी तसंच विरोधकांनीही अबू आझमी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत टीकेची झोड उठवली आहे. मुघल बादशाह औरंगजेब याच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतरआतामहाराष्ट्राचीसांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिकओळख

असलेल्या आषाढी वारीवर केलेल्या वक्तव्यामुळं अबू आझमी यांच्यामुळं पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे. यावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी टीका केली आहे दीपक केदार यांनी आपल्या पोस्ट मध्ये “वारकरी बद्दल बोलणाऱ्या अबू आझमी चा बोलविता धनी आरएसएस आहे. मताच्या धुर्वीकरणासाठी दंगलिची सुपारी घेतली आहे का? समाजकंटक म्हणून त्याच्यावर कार्यवाही करा! अशी पोस्ट करत कार्यवाहीची मागणी केली आहे.

Recent Posts