Dharashiv jilha धाराशिव जिल्ह्यात बोगस डॉक्टर कुठे प्रॅक्टिस करत आहेत का याचा शोध घ्यावा – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

महाराष्ट्र खाकी (धाराशिव / विवेक जगताप ) – धाराशिव जिल्ह्यात  अनाधिकृत  वैद्यकीय  व्यावसायिक  अर्थात बोगस डॉक्टर  कुठे प्रॅक्टिस  करत आहेत  याचा शोध तालुकास्तरीय  पथकाने अचानक  भेटी देऊन घ्यावा  असे निर्देश  जिल्हाधिकारी  किर्ती किरण  पुजार यांनी दिले. जिल्हाधिकारी  कार्यालयातील  सभागृहात दि. 24  जूनरोजीआयोजित  अनधिकृतवैद्यकीय  व्यवसायिक  अर्थातबोगस

डॉक्टर  शोध समितीची  जिल्हास्तरीय  बैठक  जिल्हाधिकारी  किर्ती किरण  पुजार यांच्या  अध्यक्षतेखाली  घेण्यात आली. यावेळी  जिल्हा  परिषदेचे  मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. मैनाक  घोष, जिल्हा  शल्यचिकित्सक  डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा  आरोग्य  अधिकारी  डॉ. सतीश  हरीदास, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी शाम  गोडभरले व  जिल्हा माहिती अधिकारी  विवेक खडसे  आदी समिती  सदस्य  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  किर्ती किरण  पुजार म्हणाले  की, जिल्ह्यात बोगस  डॉक्टर  प्रॅक्टीस  करत असल्याच्या  तक्रारी प्राप्त झाल्यास  तातडीने संबंधित  तालुकास्तरीय  पथकाने त्या ठिकाणी  भेट देवून  कारवाई  करावी. ज्या  इमारतीत वैद्यकीय व्यवसायिक  प्रॅक्टीस करतात  त्या इमारत  मालकाची एनओसी (NOC)  त्यांच्याकडे  असली पाहिजे  असे त्यांनी  सांगितले. अनधिकृत  वैद्यकीय व्यवसाय  करणाऱ्या  विरुध्द सन  2020

ते 23 जून-  2025 अखेर  धाराशिव जिल्ह्यात 72 कारवाया  करण्यात आल्याचे  जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. सतिश हरीदास  म्हणाले की, यामध्ये 36 प्रकरणे  न्यायालयात प्रलंबित  असून 20  प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे.  5 प्रकरणात  बोगस डॉक्टर  असल्याचे सिध्द झाले  तर 11 प्रकरणे  सुटल्याची  माहिती डॉ.सतीश   हरीदास दिली.

Recent Posts