महाराष्ट्र खाकी ( लातुर / प्रतिनिधी ) – जेएसपीएम (JSPM ) शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि अमली पदार्थ विरोधी दिन स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि सद्भावनेचा संदेश देणाऱ्या प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित
करताना पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी “विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, चुकीच्या सवयींपासून दूर कसे राहावे, आणि समाजासाठी जागरूक नागरिक म्हणून कसे योगदान द्यावे” याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून अमली पदार्थांचे दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांना सजग आणि सकारात्मक जीवन जगण्याचे महत्व पटवून देऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि व्यायामाचे व्यसन
लावूनघ्यावे असेआवाहनकेले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत प्राचार्य गोविंद शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव करताना त्यांच्या समाजसुधारक व शिक्षण समर्थक कार्याचा उल्लेख केला. त्यांनी शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेतला. तद्नंतर अध्यक्ष समारोपात प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांनी अमली पदार्थ
विरोधी दिन व सामाजिक न्याय दिन यांचे महत्त्व उलगडून दाखवले. त्यांनी विद्यार्थ्यांना या दिवसांचा खरा अर्थ सांगत समाजप्रबोधनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश पिस्तूलकर उपमुख्याध्यापक बाळाराम पिसारे, उपमुख्याध्यापिका अलका अंकुशे, बालाजी बोकडे, ज्योतिराम तवर, संगीता जगताप, आशा वाकडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका अलका अंकुशे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक बाळाराम पिचारे यांनी मानले.
