निटूरमोडहून सुसाट धावणाऱ्या लालपरी (S.T) निटूर गावात कधी येणार गावाकऱ्यांचा संतप्त सवाल!

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर गाव परिसरातील प्रवाशी संख्या जास्त असताना देखिल निलंगा अन्य आगारातून लालपरी याठिकाणी पूर्वी येत होत्या त्या आता निटूरमोडहुन सुसाट धावत आहेत.तसेच निटूर गावात अद्यापही कांही लालपरी येत नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. निलंगा तालुक्यातील निटूर गावची बाजारपेठ क्रमांक दोनची

असताना देखिल याठिकाणी निटूर गावात अनेक लालपरी गावात येत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे असे ? का असा सवाल संतप्त प्रवाशी विचारत आहे यास वाली कोणीही नाही का ? असाही सवाल प्रवाशी करित आहेत.म्हणून अनेक प्रवाशी प्रवास करण्याकरिता निटूरचा जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने नियमानुसार गावात प्रत्येक लालपरी आलीच पाहिजे असा

आग्रह प्रवाशांचा आहे ” तो ” प्रशासनातील भाग असल्याने प्रवाशांचे काय असाही सवाल प्रवाशांकडून व्यक्त होताना दिसत आहे. जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने लालपरी वळविण्यास मोठ्याप्रमाणात ट्राफीकमुळे अडथळा निर्माण होत असल्याची भावना अनेक लालपरी चालकांची होत असल्याने तात्काळ संबंधितांनी तोडगा काढून लालपरीचा वळविण्याचा मार्ग

सुखकर करून प्रवाशांना एक प्रकारचा सुखाचा प्रवास करू दयावा,अशी मागणी निटूर व पंचक्रोशीतील गावांची मागणी आहे. एकंदर,निटूरमोडहुन जाणार्‍या सुसाट लालपरी निटूर गावातील प्रवाशी यांना आवक-जावक करण्यासाठी मार्गस्थ करावी,अशी मागणी प्रवाशीधारकांची आहे.

जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील निटूर गावात किंवा निटूरमोड येथे लालपरी आवक-जावक करणार्‍या नावनोंदणी,संख्येसाठी संबंधितांनी फोकल पाॅंईंट निर्माण करून कर्मचार्‍याची व्यवस्था करणे आवश्यक आहे,अशी प्रवाशीधारकांची मागणी आहे.

निलंगा आगाराचे आगारप्रमुख बी.एस.राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निटूर गावामध्ये ट्राफीक जाम आणि लालपरी वळविण्यासाठी स्पेस नसल्याने लालपरी गावात येत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

Recent Posts