महाराष्ट्र खाकी (लातूर) – निष्ठूर आणि नामधारी, क्रियाशून्य लातूरचे पालकमंत्री व महापौर यांचा जाहीर निषेध! 26 महिन्यांच्या कोरोना महामारी नंतर आता दुषित पाण्याचा बाॅम्ब लातूकरांवर मरण्यासाठी सोडला आहे,या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. असे प्रेरणा होनराव यांना लातूरच्या जनतेकडून मनपा प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याबद्दल अशा या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.
त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ च्या माध्यमातून दिसून येत आहे ! मागील काही वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आणि रेल्वेने पाणी आणण्याची वेळ ओढावली. पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महाराष्ट्रभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. मात्र या सर्वांच्या जीवाशी खेळ महानगरपालिकेकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि पाणीपुरवठा
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या जिल्ह्यात लातूर शहर महानगरपालिकेत कडून गेल्या महिनाभरापासून पिवळं पाणी येत आहे. दुषित पाण्यामुळे अनेकांना आजारही जडत आहेत. या पिवळे गढूळ पाणी पुरवठ्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. लातूर शहरांमध्ये पिवळे पाणी येत असल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. या विरुद्ध भाजपा कडून भाजप युवा मोर्चा प्रदेश
सचिव प्रेरणा होनराव यांनी आधी आवाज उठवला होता त्यानंतर माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात थेट महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या ताब्यात असलेली महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. लातूरच्या नागरीकांचा आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे
पालकमंत्री अमित देशमुख आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यात लक्ष घालून नागरिकांना पिवळ्या पाण्यापासून सुटका करणं गरजेचं आहे. इतके मोठे आंदोलन होऊन ही मनपा प्रशासन काहीच हालचाल करत नाही. म्हणून प्रेरणा होनराव स्वतः ज्या भागात मनपा कडून पाणी सोडले त्या भागात जाऊन सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करून लोकांच्या प्रतिक्रिया सत्ताधार्यांना आणि प्रशासनाला ऐकवत आहेत.