पत्रकारांच्या प्रश्नांची जाण सरकारला नाही – एस.एम.देशमुख

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – सरकारने मागील दोन वर्षात पत्रकारांचा एक ही प्रश्न सोडवला नाही. छोटी वर्तमानपत्र जगली पाहिजेत. यासाठी सरकारने ग्रामीण पत्रकारांच्या बाबतीत सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे पण सरकारला पत्रकारांच्या प्रश्नांची जान नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई चे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी

गंगाखेड (जि.परभणी) येथे दि.6 शुक्रवारी आदर्श जिल्हा, तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय पत्रकार मेळावा प्रसंगी केले. या राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घघाटन बाळशास्त्री जांभेकर व संत जनाबाई यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, वृत्त निवेदक विलास बडे, किरण नाईक, किशनराव

भोसले,राजेश फड, संतोष मुंडे, गजानन नाईक, अनिल महाजन, शरद पाबळे, विजय जोशी, सुरेश नाईकवाडे, नंदकुमार महाजन, अनिल वाघमारे, प्रकाश कांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना वृत्त निवेदक बडे म्हणाले, पत्रकारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करून आत्मनिर्भर व्हावे. ग्रामीण भागातील युवकांनी पत्रकारितेत करियर करावे तर

आमदार गुट्टे म्हणाले गरजवंत लोकांना व गांवाला मदत करणे माझी प्राथमिकता आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी पत्रकार परिषदेचे कार्य कौतुकास्पद आहे. सिल्लोड, सावंतवाडी, गुहाघर, जामखेड, फलटण, रिसोड, नरखेडा, नायगाव या आठ तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास राज्यातील 348 तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

राज्यस्तरीय मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढच्या वर्षी चाकूरला – या मेळाव्यात पुढचा राज्य स्तरीय मेळावा चाकूर जि.लातूर येथे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केली. चाकूर येथे मेळावा घेण्याची मागणी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सह सरचिटणीस

संगमेश्वर जनगावे, माजी तालुकाध्यक्ष माधवराव तरगुडे, तालुकाध्यक्ष सदाशिवराव मोरे पाटील, सचिव विकास स्वामी, संग्राम वाघमारे यांनी चाकूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने केली होती.

Recent Posts