महाराष्ट्र

आमदार रमेशआप्पा कराड यांच्याकडून गंगापुर सोसायटी नूतन संचालकांचा सत्कार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके )– लातूर तालुक्यातील मौजे गंगापुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत भाजपाच्या पॅनलने घवघवीत यश संपादन केले असून नवनिर्वाचित सोसायटीच्या संचालकाचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भाजपाचे कार्यकर्ते गंगापूर येथील सरपंच बाबु हणमंतराव खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलने काँग्रेसच्या दिग्‍गज पुढार्‍यांचा धुव्वा उडवित गेल्या 35 वर्षांपासून भाजपाची सोसायटीवर असलेली सत्ता कायम ठेवली. गंगापूर सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल नवनिर्वाचित संचालकांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी बुधवारी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नूतन संचालक बाबु हणमंतराव खंदाडे, नारायण व्यंकटराव शिंदे, सतीश श्रीहरी धोत्रे, सुग्रीव भागुराम वाघे, जर्नाधन काशिनाथ फुटाणे, मधुकर लक्ष्मण सुर्यवंशी, शेषेराव अनंतराव दंडीमे, माजीद महम्मद शेख, दगडु इब्राहिम शेख, राम हरीबा बनसोडे, सौ. शितलताई अमरदिप शिंदे, सौ राजश्री प्रतापराव शिंदे, सौ नागरबाई शेषराव राऊत यांच्यासह विनोद दंडीमे. बाळू चामे. सूर्यभान मस्के. सचिन खंदाडे यांच्यासह अनेक जण होते.

Most Popular

To Top