राजकारण

आमदार रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांचा सत्कार

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – माजी खा.रूपाताई ( अक्का ) पाटील निलंगेकर यांचा आ.रमेशअप्पा कराड यांच्या कार्यालयामध्ये आदरपूर्वक शाल,पुष्पगुच्छ,प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. माजी खा.रूपाताई ( अक्का ) पाटील निलंगेकर यांनी आ.रमेशअप्पा कराड यांच्या कामाची स्तुती करून संवाद साधल्याचे समजते.आ.रमेशअप्पा कराड हे अध्यात्मिकते

खुप महत्त्व देणारे असल्याने त्यांची कामाची पध्दत ही नियोजनबध्द असते त्यामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात आजही त्यांचा दबदबा आहे त्यांनी आपल्या विकासात्मक कामाच्या जोरावर आपली मोट बांधली आहे.त्यामुळे आ.रमेशअप्पा कराड यांच्या आमदार होण्यामागे माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मोठा वाटा आहे.सोबत, प्रदेश सचिव

अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मुळेही आमदारकी मिळवण्यात साथ मिळाली आहे.याप्रसंगी माजी खा.रूपाताई ( अक्का ) पाटील निलंगेकर यांच्या सत्कारावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांची उपस्थिती होती.

Most Popular

To Top