महाराष्ट्र

पालकमंत्री ना.अमित देशमुख साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त लक्ष्मीनरसिंह देवताला मंत्रोच्चारात केला महाभिषेक

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमीत विलासराव देशमुख यांच्या वाढ दिवसा निमित्ताने 21 मार्च रोजी सोमवारी सकाळी 7 वाजता लातूर येथील श्री उत्तरादिमठात श्री लक्ष्मी नरसिंह देवताला मठाधीकारी श्री रघुत्तमआचार्य जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 21 विद्वान ब्राम्हण यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला या अभिषेक सोहळ्याचे यजमान जिल्हा समाज माध्यम काँग्रेसचे अध्यक्ष पत्रकार श्री हरीराम कुलकर्णी यांनी केले होते

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संजय नीलेगावकर, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशपांडे,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, माजी सभापती राजकुमार जाधव, बबनराव जोशी, नारायण कुलकर्णी, कृष्णा देशमुख, विष्णू देसाई, रामकृष्ण पंत,राज देशमुख, सुनील पाटील, पिंपळे, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्वान पंडीत ब्राम्हण मंडळींचा व प्रमुख अतिथी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त ब्रम्हवृंदानी आपल्या मंत्रोच्चार करत आशिर्वचन केले त्यांना शुभेच्छा दिल्या निरोगी आरोग्य राहावे मोठ्या उच्च पदावर विराजमान व्हावे अशी प्रार्थना भगवंताकडे केली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पत्रकार हारिराम कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय निलेगावकर यांनी आभार मानले

Most Popular

To Top