महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाला सुरुवात – जिल्हाप्रमुख शिवाजी माने

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – महाराष्ट्रमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या सरकारच्या माध्यमातून झालेली कामे तसेच शिवसेनेची संघटन बांधणी व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांना बळ देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

यांच्या आदेशाने शिवसेना शिव संपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली असल्याचे शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून महाराष्ट्रामध्ये दिनांक

22 मार्च 2022 ते 25 मार्च 2022 या कालावधीमध्ये शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे यानुसार लातूर जिल्ह्यामध्ये शिव संपर्क अभियानासाठी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच सोबत 10 संपर्कप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या अनुषंगाने दिनांक 23 मार्च 2022 रोजी खासदार धैर्यशील माने

सदरील शिव संपर्क अभियानाच्या बाबतीत पक्षाच्या बाबतीत शासनाने घेतलेले निर्णय सर्वसामान्य पर्यंत पोहोचणे च्या बाबतीत पत्रकार परिषद घेणार आहेत व संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहेत सोबत संपर्कप्रमुख संजय मोरे हे असणार आहेत तसेच लातूर जिल्ह्यामध्ये

औसा तालुक्यासाठी आशितोष मार्कंडे निलंगा संतोष धनावडे शिरूर आनंतपाळ संजय नटे देवणी
शिवाजीराव पाटील तसेच लातूर महानगरपालिकेसाठी संजय नटे व शिवाजीराव पाटील हे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे खासदार धैर्यशील माने

शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व संपर्कप्रमुख आपल्या तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाची बांधणी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी व कार्याचा आढावा संपूर्ण पंचायत समिती गणा पर्यंत जाऊन घेणार आहेत

यासाठी लातूर, औसा, निलंगा, देवनी शिरूर आनंतपाळ या तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, लोकप्रतिनिधी, शासकीय कमिटी यावरील नियुक्त

सर्व सदस्य, नियोजन कमिटीचे सदस्य ,युवा सेना ,महिला आघाडी, शिवसेनेच्या अंगीकृत सर्व संघटना यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदरील शिव संपर्क अभियानामध्ये नेमउन दिलेल्या सर्व संपर्कप्रमुख यांच्या

सोबत राहून सर्व संपर्क प्रमुख यांना अभिप्रेत असणारी माहिती देण्यात यावी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुकाप्रमुख यांच्याशी संपर्कात राहून प्रत्येक पंचायत समितीच्या गणा पर्यंत चा दौरा आखावा आणि खासदार धैर्यशील माने व संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत

असलेल्या सर्व संपर्क प्रमुखांना सहकार्य करावे या कामात कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारची हयगय करू नये जबाबदारीचं भान ठेवून नियोजनबद्ध कार्यक्रम आखावेत व सहकार्य करावे असे लातूर शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Most Popular

To Top