महाराष्ट्र

लातूरचे माजी खासदार डॉ सुनील गायकवाड़ संत चोखामेळाच्या जन्मभुमी विकासासाठी प्रयत्न करणार

महाराष्ट्र खाकी ( देऊळगाव राजा ) – महाराष्ट्रातील थोर वारकरी संत चोखामेळा महाराज यांचे जन्मस्थान असलेले मेहुणाराजा येथे संत चोखामेळा अध्यासन केंद्र , चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समिती व संत चोखामेळा बंका निर्मळा संस्थान यांच्या वतीने सामुदायिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .

” चोखोबा ते तुकोबा, एक वारी समतेची ” या सामाजिक उपक्रमाला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या उपक्रमाची माहिती पुस्तिका संत चोखामेळा यांच्या चरणी विश्व दलित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष , माजी खासदार डॉ. सुनिल बळीराम गायकवाड यांच्या शुभहस्ते अर्पण करण्यात आली. चोखामेळा महाराज यांचे विचारधन हे माणसाची मन जोडणारे आहे , सामाजिक एकता अन बंधुभावाचे उदगाते असलेल्या संत चोखामेळा महाराज यांच्या जन्मभूमीत आल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे असे सांगत संत चोखा मेळा जन्मस्थल विकासासाठी प्रयत्न करनार आणि

मोठे स्मारक मंदिर उभा करन्यासाठी सदैव आपल्या सोबत आहे असे यावेळेस उपस्थितांना डॉ सुनील बलिराम गायकवाड़ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले .संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे यांच्या वतीने मागील चार वर्षांपासून 1 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान श्रीक्षेत्र मंगळवेढा ते श्री क्षेत्र देहू या दरम्यान ” तुकोबा ते चोखोबा, एक वारी समतेची ” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सदरील उपक्रमाची माहिती देणाऱ्या ‘ चित्रमय समता वारी ‘ ही पुस्तिका आज संत चोखामेळा महाराज यांना अर्पण करण्यात आली .

संत चोखामेळा यांचे साहित्य व विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न एक वारी समतेची या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. आगामी काळात हे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहोत. याचाच एक भाग म्हणून सामाजिक एकतेसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना संत चोखामेळा यांच्या नावाने मेहुणा राजा येथील चोखोबांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देण्याचा आपला मानस असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.

सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार तोताराम कायंदे, देऊळगाव राजाचे माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबुराव काकड , गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, मेहूणा राजाच्या सरपंच मंदाताई बोंद्रे, भीमराव मोटे, संत चोखामेळा बंका निर्मळा संस्थानचे विश्वस्त श्रीकांत कुळकर्णी, दंदाले सर,

ग्रामसेवक मदन वायाळ, ग्राम पंचायत सदस्य बबन डोंगरे, पत्रकार गजानन घुगे, ताहेरभाई , निळूभाऊ चौधरी , अनंतराव कुलकर्णी , रेणुकादास मुळे , संजय राजे जाधव आणि स्थानिक गावकरी व भाविक या वेळेला उपस्थित होते. विनोद कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. सामुहिक महाआरतीने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

Most Popular

To Top