पोलीस

किल्लारी पोलिस स्टेशन मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले

महाराष्ट्र खाकी (किल्लारी) – लातूर जिल्ह्यामधील किल्लारी पोलीस स्टेशन मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशन मध्ये स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. किल्लारी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी साहेब सावंत वय- 38 यांनी मध्यरात्री स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

काही दिवसांपासून सावंत पैशांच्या देवाण- घेवाणीच्या मानसिक त्रासातून जात होते.यातूनच ही आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सावंत हे कासार शिर्शी येथे असताना त्यांनी काही जमीन खरेदी केली होती . यामधून काही आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहारामधून पैशाचे वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे . शनिवारी मध्यरात्री त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये रायफलचा वापर करत आत्महत्या केली आहे. किल्लारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगले किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते . मृतदेह पोस्टमार्टमकरिता लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयत पाठवण्यात आला आहे. आत्महत्येअगोदर सावंत यांनी चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली होती. त्याची सत्यता तपासणी सुरू असल्याचे माहिती दिली आहे. साहेब सावंत यांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

 

Most Popular

To Top