महाराष्ट्र

उस्मानाबादचे स्थानिक आमदार व खासदार यांनी 94 कोटींची तरतूद करण्यात आल्याची खोटी माहिती देऊन जिल्हावासियांची घोर फसवणूक केली – आमदार राणाजगजीतसिंह पाटील

महाराष्ट्र खाकी (उस्मानाबाद) – राज्या सरकारने मागेच जाहीर केले होते की जिल्हा तिथे शासकीय मेडिकल कॉलेज. उस्मानाबाद येथील मेडिकल कॉलेजसाठी केवळ रु.9.4 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असताना उस्मानाबादचे स्थानिक आमदार व खासदार यांनी 94 कोटींची तरतूद करण्यात आल्याची खोटी माहिती देऊन जिल्हावासियांची घोर फसवणूक केली आहे. असा आरोप तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे.

ही बाब अत्यंत दुर्दैवी, खेदजनक व तेवढीच घृणास्पद आहे. असेही ते म्हणाले,9.4 आणि 94 यामधील फरक न कळण्याइतपात अज्ञान ? की जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल ? एवढ्या मोठया लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकप्रतिनिधींसाठी ही बाब अत्यंत अशोभनीय आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निदान 2022-23 या शैक्षणिक वर्षात तरी सुरू होईल अशी अपेक्षा होती.

मात्र या अर्थसंकल्पात केवळ रु. 9.4 कोटी रुपयांची तरतूद करून महाविकास आघाडी सरकारने उस्मानाबादकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत आणि याहून मोठा कहर म्हणजे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून जिल्हावासीयांची दिशाभूल केली जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असताना यांनी जाहीर केलेले रु.94 कोटी याच अर्थसंकल्पात मंजूर करून घेण्याची जबाबदारी या लोकप्रतिनिधींची आहे. असेल परखड मत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी वेक्त केले आहे.

 

 

Most Popular

To Top