पोलीस

10 लाखांची लाच घेताना सेलू येथील DYSP राजेंद्र पाल यांच्या अंतर्गत काम करणारा पोलीस गणेश लक्ष्मणराव चव्हाणला पहाटे पकडण्यात आले

महाराष्ट्र खाकी (परभणी) – पोलिस दलाने कोरोनाच्या काळात औतुकास्पद कामगिरी केली आहे सर्व जनता पोलिसांवर देवासारखा विश्वास ठेवत आहेत. पण यात मिठाचा खडा टाकण्याचे काम काही पोलिस अधिकारी करत आहेत. आशिच एक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे.गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची मागणी करून त्यातील दहा लाखांची लाच घेताना सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करणारा पोलीस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण पहाटे पकडण्यात आले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP राजेंद्र पाल यांच्यासह चव्हाणला अटक झाली आहे. त्यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( ACB ) पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सेलू पोलीस स्टेशन मध्ये 3 मे रोजी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मृताच्या पत्नीसोबत एका व्यक्तीची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी त्याला 9 जुलैला कार्यालयात बोलावून घेतले होते. ‘तुझी ऑडिओ क्लिप मी ऐकली असून, यातून बाहेर पडायचे असेल तर तू मला दोन कोटी रुपये दे, असे DYSP राजेंद्र पाल यांनी धमकावले. नंतर DYSP राजेंद्र पाल यांनी त्याला कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. संबंधित व्यक्तीने याची तक्रार मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात 22 जुलैला केली. या तक्रारीनुसार विभागाच्या अधिकाऱ्यांनी 23 जुलैला तक्रारीची खात्री करून घेतली . त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे ACB च्या निदर्शनास आले. नंतर त्यांची 1 कोटी 50 लाख रुपयांवर तडजोड झाल्याचेही समोर आले. त्यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलिस स्टेशनमाधील पोलीस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. याप्रकरणी सेलू येथील पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

To Top