देश

लातूरचे मा.खा.डॉ सुनील गायकवाड “इंडियन स्टार्स अवार्ड”ने सम्मानित

महाराष्ट्र खाकी ( मुबई ) – भारताच्या लोकसभेत आणि लातूरच्या राजकारणात, समाजकारणात आपल्या शांत आणि अभ्यासू व्रत्तीमूळे आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवणारे लातूरचे माजी लोकप्रिय खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी लातूरच्या जनतेसाठी अनेक योजना खासदारकीच्या पाच वर्षाच्या काळात राबविल्या,त्यात रेल्वे नी पाणी,रेल्वे बोगी कारखाना,अनेक नवीन रेल्वे सुरू केल्या,उदगीर,लातूर रोड स्टेशन वर दादरा निर्माण, खास करून पंढरपूर च्या आषाढी आणि कार्तिकी साठी स्पेशल ट्रेन सुरु केली कमी दरात. मुस्लिम समाज च्या इस्तेमा साठी गुलबर्गा औरंगाबाद विशेष ट्रेन सुरु केले.लातूर चे सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल सुरू केले.पासपोर्ट साठी पासपोर्ट कार्यालय सुरू केले.नॅशनल हायवे चे जाळे निर्माण केले. मेडिकल आणि इंजिनियरिंग च्या विद्यार्थ्या साठी लातूर आणि नांदेड येथे NEET चे परीक्षा केंद्र सुरू केले.लोकसभा मतदार संघातील तर कामे केलेच पण देश पातळीवरील अनेक विषय संसदेत मांडले.अनेक कायद्यावर अभ्यासपूर्ण भाषने संसदेत केले.आणि उच्च शिक्षित खासदार म्हणून 16 व्या लोकसभेत संसद रत्न पुरस्काराने ही सन्मानित केले आहे. या सर्व कार्यामुळे लातूर चे 16 वी लोकसभे चे खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना खूप मानाचा पुरस्कार “इंडियन स्टार्स अवार्ड 2021″ मुंबई ग्लोबल न्यूज पेपर आयोजित जूह येथे शानदार कार्यक्रमात प्रसिद्ध फिल्म अभिनेता, प्रसिद्ध गायक ज्यांचे गाने ” तू तू तुना तुना ना” खुप लोकप्रिय झाले होते ,असे माननीय अरुण बक्शी जी च्या हस्ते हा अवार्ड देऊन सम्मानित केले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक राजकुमार तिवारी आणि बॉलिवूडचे क्षेत्रातील अनेक सिने कलावंत,अनुप जलोटा,कैलास मासूम,अरुण बक्सी, आदी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. या सन्मानमुळे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Most Popular

To Top