महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मधून लालासाहेब (पप्पू) धोत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाने त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल लालासाहेब धोत्रे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महाराष्ट्राचे नेते अमित देशमुख तसेच माजी आमदार धीरज देशमुख यांचे विशेष आभार मानले.
आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लालासाहेब (पप्पू) धोत्रे म्हणाले, “प्रभागातील मायबाप जनतेची सेवा आजवर प्रामाणिकपणे केली असून पुढेही ती अविरतपणे सुरू राहील. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मतदार, मित्र, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या विश्वासावरच मी जनसेवेत अधिक ताकदीने काम करणार आहे. सर्वांच्या आशीर्वादानेच ही लढाई यशस्वी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होताच प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचाराला वेग येण्याची शक्यता असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.


