latur lmc election प्रेरणा होनराव यांचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल भाजप वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार लातूर महानगरपालिका निवडणुकीत प्रवेश

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूरच्या राजकारणातील प्रभावी, अभ्यासू आणि युवा नेत्या प्रेरणा होनराव यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रेरणा होनराव म्हणाल्या, “भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. पक्षाने दिलेली जबाबदारी ही केवळ संधी नसून मोठी जबाबदारी आहे. लातूर शहराच्या विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”

प्रेरणा होनराव या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असून त्यांची अभ्यासू भूमिका, स्पष्ट मतप्रदर्शन आणि संघटनात्मक बांधणी यामुळे त्या भाजपच्या युवा नेतृत्वात महत्त्वाचे स्थान मिळवून आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा होनराव यांच्या उमेदवारीमुळे लातूर शहरातील भाजप सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भाजपकडून ही उमेदवारी रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे.