अर्ज भरण्यापुरती नेतेगिरी नव्हे, प्रत्यक्ष कामाची ओळख म्हणजे सुंदर पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – आठ वर्षे जनतेच्या प्रश्नांपासून दूर, राजकीय झोपेत असलेले माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी जि. प. अध्यक्ष प्रतिभा पाटील कव्हेकर आणि भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांना अखेर फॉर्म भरण्याच्या अवघ्या आठ तास आधी जनसेवेची अचानक आठवण झाली. इतके दिवस जनतेच्या दुःख–वेदना, विकासाची रखडलेली कामे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे ज्यांनी पाठ फिरवली, ते आज अचानक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

खरी जनसेवा ही निवडणुकीच्या वेळेपुरती नसते, तर ती सातत्याने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केली जाते. प्रभाग क्र. 18 मधील काँग्रेसचे उमेदवार आणि समाजसेवक सुंदर पाटील कव्हेकर हे मात्र गेली अनेक वर्षे कोणताही गाजावाजा न करता सामान्य जनतेसोबत उभे राहिले. संघर्षात साथ, अडचणीच्या काळात मदत आणि विकासासाठी सातत्याने पाठपुरावा—हीच त्यांची ओळख आहे.

आज जनतेला दिखाऊ जाग येणारे नेते नकोत, तर प्रत्यक्ष काम करणारे सुंदर पाटील कव्हेकर यांच्या सारखे नेतृत्व हवे आहे. आठ तास आधी जाग येणारी जनसेवा नव्हे, तर आठ वर्षे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी सेवा हीच खरी कसोटी आहे—आणि त्या कसोटीत सुंदर पाटील कव्हेकर खरे उतरतात, हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही असे प्रभाग क्र 18 मधील जनतेला वाटत असणार हे नक्की आहे.