Latur police PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात LCB ची 2025 मध्ये गुन्हेगारीवर जबरदस्त कारवाई, 17 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त, खुनांसह गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत  गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सन 2025 मध्ये  उल्लेखनीय कामगिरी  केली आहे. चोरी, दरोडा, घरफोडी, अवैध धंदे, अमली  पदार्थ तस्करी  आणि संघटित  गुन्हेगारीविरोधात  राबवलेल्या विशेष  मोहिमांमधून एकूण 17 कोटी 27 लाखांहून  अधिक  किमतीचा मुद्देमाल

जप्त करण्यात  आला आहे.  जिल्हा पोलीस  अधीक्षक अमोल तांबे यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि  अपर पोलीस  अधीक्षक मंगेश  चव्हाण यांच्या  देखरेखीखाली,  पोलीस  निरीक्षक सुधाकर बावकर  आणि PSI  राजेश घाडगे  यांच्या नेतृत्वात LCB ने  गुन्हेगारीविरोधात  आक्रमक व  आधुनिक पद्धतीने कारवाई  केली. चोरी, दरोडा  व जबरी  चोरीचे 227 गुन्हे उघड सन  2025 मध्ये LCB  ने घरफोडीचे  81 गुन्हे, चोरीचे 111

गुन्हे, जबरी  चोरीचे 03 गुन्हे,  तसेच बाहेरील  जिल्ह्यातील 32 गुन्हे  उघडकीस आणत  4 कोटी 63 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल  हस्तगत केला आहे.  खुनाच्या क्लिष्ट गुन्ह्यांचा उलगडा  एलसीबीने 10 गंभीर व संवेदनशील खुनांच्या गुन्ह्यांचा  यशस्वी उलगडा  करून 13 आरोपींना अटक केली. यामध्ये  वाढवणा हद्दीतील  महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये  टाकण्याचा प्रकार,  औसा हद्दीतील कार जळीत

करून  स्वतःचा मृत्यू  दाखवण्याचा  बनाव, तसेच  किनगाव येथील  बहुचर्चित दरोडा  प्रकरण यांचा समावेश  आहे. अवैध धंद्यांवर कडक  कारवाई 12.63  कोटींचा  मुद्देमाल जप्त एलसीबीने  अवैध व्यवसायांविरोधात  मोठ्या प्रमाणात कारवाई  करत जुगाराचे 115  गुन्हे, दारू  हातभट्टीचे 286 गुन्हे,  गुटखा-तंबाखू  तस्करीचे 38  गुन्हे, अवैध वाळू  उपसाचे 46 गुन्हे, अमली पदार्थ  तस्करीचे 09 गुन्हे नोंदवत एकूण 549

गुन्ह्यांमध्ये  12 कोटी 63 लाख  55 हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला  आहे. यामध्ये 95 ग्रॅम  एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स, तसेच 7  गावठी कट्टे जप्त  करण्यात आले.  MPDA, MCOCA  आणि BNSS  अंतर्गत कठोर  कारवाई MPDA अंतर्गत 02  सराईत गुन्हेगारांना  स्थानबद्ध, MCOCA अंतर्गत 20  आरोपींवर कारवाई,  BNSS अंतर्गत 20 जणांवर  प्रतिबंधात्मक प्रस्ताव,  वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध हद्दपारी/

तडीपार कारवाई  करण्यात आली आहे.  आधुनिक तंत्रज्ञान आणि गुप्तचर जाळ्याचा प्रभावी वापर मोबाईल-सीसीटीव्ही विश्लेषण,  सायबर इंटेलिजन्स,  सोशल मीडिया मॉनिटरिंग, मोडस ऑपरेंडी  अभ्यास आणि  आंतरजिल्हा-आंतरराज्य समन्वयामुळे  LCB ला गुन्हेगारांपर्यंत  जलद पोहोचणे शक्य झाले आहे.  पोलीस प्रशासनाने  नागरिकांना  आवाहन केले आहे की, कोणतीही  संशयास्पद  हालचाल, अवैध  व्यवसाय

किंवा गुन्ह्याची माहिती  तात्काळ पोलिसांना  द्यावी. जनतेच्या सहकार्यामुळेच  गुन्हेगारीवर नियंत्रण शक्य होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. LCB  ही केवळ तपास  यंत्रणा नसून, लातूर जिल्ह्याच्या  सुरक्षेचे मजबूत  कवच आहे, असे या कामगिरीतून  पुन्हा एकदा सिद्ध  झाले आहे.