मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची धडक पाहणी; विधानभवन वैद्यकीय केंद्राची तपासणी



महाराष्ट्र खाकी ( मुंबई / विवेक जगताप)-   राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानभवनातील वैद्यकीय तपासणी केंद्राला मंगळवारी (२५ फेब्रुवारी) रात्री ११.३० वाजता अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे विधानभवन परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रथमोपचारासह सर्व वैद्यकीय सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात येतात.

सभागृहाचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी प्रत्यक्ष केंद्रात जाऊन तेथील सुविधा, मनुष्यबळ व उपलब्ध वैद्यकीय यंत्रणांची सविस्तर माहिती घेतली. अधिवेशन काळात आमदार, अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत वेळेत मिळावी, यासाठी व्यवस्था सक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणीमुळे विधानभवन परिसरातील आरोग्य सुविधांबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत असून, अत्यावश्यक सेवांची गुणवत्ता कायम राखण्यावर आरोग्य विभागाचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Recent Posts