महापालिका निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचे निलंबिन

महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप) – पुणे महापालिका निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने सार्वजनिक बांधकाम  विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहे . राज्यत महानगरपालिका निवडणुकीची  रनधुमाळी सुरु  आहे  राजकीय  पक्ष तयारी सुरु आहे  तशीच  प्रशासनाची  तयारी पण  केली आहे,  त्या साठी निवडणुकीच्या  कामासाठी  काही अधिकाऱ्यांच्या  नेमणूक केल्या

आहेत पण  काही अधिकारी  या नेमणूक  स्वीकारण्यास टाळाटाळ करत  असतात त्याना  प्रशासनाकडून  कारवाया पण सुरु आहेत, आशाच  कामचुकार आणि  टाळाटाळ  करणाऱ्या अधिकाऱ्यावर  सार्वजनिक  बांधकाम  विभागाच्या  कनिष्ठ अभियंता  अस्मिता गाडीवडर  यांना निलंबित  करण्यात आले आहे. पुणे  महापालिकेच्या निवडणुक  कार्यालयाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे  उपायुक्त प्रशांत  ठोबरे यांनी  याबाबतचे

आदेश  दिले आहेत. पुणे  महापालिकेची  निवडणुक जाहीर झाली आहे. त्यामुळे  निवडणूक कामकाज  हे राष्ट्रीय कर्तव्य असून राज्य  निवडणूक आयोगाचे  वेळोवेळी आदेश  विचारात घेऊन  विविध कार्यालयाकडील  कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामासाठी  उपलब्ध करून  देण्यात आले आहेत. मात्र काही कर्मचारी  हे त्यांना नेमून  दिलेल्या कार्यालयांकडे  हजर न झाल्याने  निवडणूक  विषयक कामामध्ये  अडचणी निर्माण

झालेल्या आहेत. त्यामुळे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडे नियुक्ती केली असताना त्या कर्तव्यावर हजर राहिल्या नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहेत.