महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – राजकारणाच्या गजबजाटातही माणुसकी, संस्कार आणि नात्यांची ऊब जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वावर लिहिलेले “देवघरातील देव : शिवराज पाटील चाकूरकर” हे पुस्तक आज अत्यंत भावनिक आणि सुसंस्कृत वातावरणात प्रकाशित झाले. देवघर या पवित्र आणि स्मृतिमयस्थळी, भाजपा नेत्या व लातूर भाजपा नेत्या डॉ.अर्चनाताई पाटील
चाकूरकरतसेच उद्योजक शैलेश पाटील चाकूरकरयांच्याशुभहस्ते याग्रंथाचे प्रकाशनसंपन्न झाले. हेपुस्तक लातूरचेमाजी खासदार, संसद रत्नसन्मानित प्रा. डॉ. ॲड. सुनीलवत्सला बळीरामगायकवाड यांनीलिहिले असून, तेकेवळएकचरित्र नसून—शिवराज पाटीलचाकूरकर यांच्याशीजोडलेल्या आठवणी, नात्यांतील आपुलकी, संघर्षाची जाणीवआणि संसदेत त्यांनीकेलेल्या लोकहितकारी कार्याचा
सखोल, प्रामाणिक आणिभावनिक लेखाजोखाआहे. लेखकाने आपल्यालेखणीतून केवळसंसदीय कामगिरीमांडलेली नाही, तरशिवराज पाटीलचाकूरकर यांचेसंवेदनशील मन, मूल्यनिष्ठ राजकारण , सामान्य माणसाशीअसलेली नाळआणिदेवघरासारख्या पवित्रस्थळाशीजोडलेलीत्यांची आत्मिकओळख अत्यंतप्रभावी शब्दांतउलगडली आहे. त्यामुळेहा ग्रंथवाचकांना केवळ माहितीदेत
नाही, तर अंतर्मुख करतो. या प्रकाशनप्रसंगी डॉ. अर्चनाताईपाटील चाकूरकर, शैलेशपाटील चाकूरकरतसेचसुप्रीमकोर्टच्या ॲड. रुद्रालीपाटील चाकूरकरयांनी ग्रंथाचेमनापासून कौतुककरत समाधानव्यक्तकेले. “हाग्रंथ म्हणजेस्मृतींचासुगंध, कार्याचा गौरवआणि पुढील पिढीसाठीप्रेरणादायी दीपस्तंभ आहे,” अशाभावना यावेळीव्यक्तकरण्यात आल्या. “देवघरातील देव : शिवराज पाटील
चाकूरकर ” हा ग्रंथ राजकीय चरित्राच्या चौकटीपलीकडे जाऊन संस्कार, नातेसंबंध , सेवाभाव आणि लोकशाही मूल्यांचा साहित्यिक उत्सव ठरतो. लातूरच्या सामाजिक -राजकीय इतिहासात हा ग्रंथ एक भावनिक, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी दस्तऐवज म्हणून निश्चितच अढळ स्थान मिळवेल. याप्रसंगी लेखक डॉ सुनील सुनील बळीराम गायकवाड, शैलेश पाटील चाकुरकर ,डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर ,एडवोकेट रुद्राली पाटील चाकूरकर, एडवोकेट ऋषिका शैलेश पाटील चाकूरकर ,वैशाली कलबुर्गी अमेरिका आदी मान्यवर उपस्थित होते.


