महाराष्ट्र खाकी (लातूर /प्रतिनिधी ) – काँग्रेसचे नगरसेवक रविशंकर जाधव व पुनित पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व कल्याणकारी कार्यावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश घेतला.विकासाला पाठबळ देण्यासाठी भविष्यातही अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे मत लातूर शहर निवडणूक प्रमुख माजी मंत्री आ. संभाजीपाटील
निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केले. गुरुवारी (दि. 25) आ.संभाजी पाटील निलंगेकर,आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. निलंगेकर बोलत होते.आ. संभाजी
पाटील म्हणाले, मागील. 11 वर्षात देशात व राज्यात होत असलेली विकासकामे जनतेने पाहिली आहेत. भाजपाच्या विचारावरील सरकार देशात असून या पक्षात देशहिताला प्राधान्य दिले जाते . या काळात देशाची विकासाच्या मार्गावर घोडदौड सुरू आहे. त्यामुळे इतर पक्षात नेते व कार्यकर्त्यांनाही आता भवितव्य राहिलेले नाही. यामुळेच भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे आ. निलंगेकर
म्हणाले. रविशंकर जाधव व पुनीत पाटील यांच्या समवेत यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोळुंके, स्वस्त धान्य दुकान असोसिएशन अध्यक्ष हंसराज जाधव, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक देडे तसेच गनिमीकावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड, धर्मेंद्र चौहान , जितेंद्र चौहान , ऋषी पाटील यांनीही यावेळी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे लातूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक
बळकट झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची वाटचाल अधिक मजबूत झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे, प्रेरणाताई होनराव , सुधीर धुत्तेकर, सरचिटणीस संजय गिर, रागिणी यादव, प्रविण कस्तुरे, निखिल गायकवाड, निवडणूक कार्यालय प्रमुख तुकाराम गोरे यांच्यासह पक्षाचे मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


