महाराष्ट्र खाकी (लातूर/ विवेक जगताप) – लातूर पॅटर्न मध्ये तंबाखू मुक्त शिक्षणसंस्था अभियानाचा केवळ धूर निघत आहे. लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था आणि शाळांच्या आवारात तंबाखूसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावरील निर्बंधाबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आत, प्रत्येक मजल्यावर जिन्यासह तसेच लिफ्टच्या प्रवेशद्वारावर लाल
रंगात ‘धूम्रपान निषिद्ध क्षेत्र’ लिहिलेली चिन्हे बंधनकारक केली आहे. मात्र, लातूर शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांसमोर फलक लावण्यात आलेले दिसून येत नसल्याने शाळा तंबाखू मुक्त अभियानाचा केवळ ‘धूर’ निघाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे हे सर्व लातूर जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, अन् भेसळ विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या निष्काळजी पणा मुळे सरकारची तंबाखू मुक्त
शिक्षणसंस्था योजनेचा धूर निघत आहे. या मुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत, बरेच विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले आहेत तर काही ठिकाणी तर शिक्षक आणि विद्यार्थी गुटखा, सिगारेट, तंबाखू आणि सुपारी एकत्र खाताना / सेवन करताना दिसत आहेत. पण या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लातूर पॅटर्न ची प्रतिमा मालिन होताना दिसत आहे. खाकी फाऊंडेशन या संदर्भात पुढाकार घेऊन ज्या शिक्षण संस्था या तंबाखू मुक्त अभियानात जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहेत अशा शिक्षण संस्थाबाबत तक्रार आणि बातम्या प्रकाषित करणार आहे.


