सतीश चव्हाणांना पदवीधरच घरचा रस्ता दाखवणार! मागील कार्यकाळात पदवीधर मतदारांना फसवले, आता फडणवीसांच्या आशीर्वादानेही वाचणार नाही..!
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्रातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले सतीश चव्हाण यांना यंदा पदवीधरांनीच घरचा रस्ता दाखवणार, असे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. मागील कार्यकाळात पदवीधर मतदारांच्या मतांवर निवडून आल्यानंतर त्यांच्या समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या या नेत्याला आता पदवीधर मतदारांनीच घरी बसवण्याची तयारी केली आहे….









