प्रभाग १५ : शिक्षणाचे केंद्र, विकासाची अपेक्षा – प्रेरणा होनराव यांचा विजय निश्चित..!

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ हा लातूरच्या शिक्षण क्षेत्राचे होम ग्राऊंड म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या विविध भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये येत असल्याने या प्रभागात शैक्षणिक वातावरणासोबतच मोठ्या प्रमाणावर व्यापारी हालचाल दिसून येते. हॉस्टेल्स, भाड्याने घरे, उपाहारगृहे, किराणा दुकाने, स्टेशनरी, मेडिकल्स अशा विविध व्यवसायांमुळे हा परिसर सतत गजबजलेला असतो.

या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सुस्थितीत रस्ते, प्रभावी नाल्यांची व्यवस्था, नियमित व पुरेसे पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध झाल्यास या भागातील व्यापार अधिक वेगाने वाढू शकतो. त्याचबरोबर लातूर महानगरपालिकेच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होऊ शकते, अशी ठाम भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या सर्व बाबींची जाण आणि दूरदृष्टीपूर्ण विचारसरणी प्रभाग १५ च्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रेरणा होनराव यांच्याकडे असल्याचे मतदारांचे मत आहे. शिक्षण, व्यापार आणि स्थानिक नागरिक यांचा समतोल साधत सर्वांगीण विकास साधण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास मतदारांमध्ये दृढ झाला आहे.

म्हणूनच प्रभाग १५ मधील व्यापारी वर्ग, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये प्रेरणा होनराव यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १५ मधून त्यांचा विजय निश्चित असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.