महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप / लातूर) – प्रभाग क्र. ६ मधील लोकमनाचा आवाज – आर. डी. काळे यांना उमेदवारी देण्याची भावनिक हाक, लातूर शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष लोकांच्या मनातील उमेदवार शोधण्याच्या प्रयत्नात असताना, लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा (६) मधील जनतेने मात्र हा शोध आधीच पूर्ण केला असल्याचे
दिसत आहे. “आर. डी. काळे यांना उमेदवारी दिली तर खऱ्या अर्थाने लोकमनाचा सन्मान होईल,” अशी भावना आज या प्रभागातील नागरिकांच्या ओठावरून व्यक्त होत आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसून तो लोकांच्या दुःखात सहभागी होण्याचा, त्यांच्या अडचणींना आपलेसे करण्याचा मार्ग असावा, अशी अपेक्षा जनतेची असते. सुशिक्षित, सामाजिक बांधिलकी जपणारा, प्रशासकीय
कामाचा अनुभव असलेला आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणारा उमेदवारच लोकांच्या मनात स्थान मिळवतो. या सर्व कसोट्यांवर खरे उतरणारे नाव म्हणजे प्रभाग क्र. ६ मधील आर. डी. काळे हे सुसंस्कृत विचारसरणी, उच्च शिक्षण, यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आणि त्यासोबत समाजासाठी झटण्याची वृत्ती ही आर. डी. काळे यांची खरी ओळख आहे. विशेष म्हणजे मराठा चळवळीत त्यांनी केलेले
उल्लेखनीय कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच प्रभागातील नागरिकांना त्यांच्या कार्यावर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे. रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आर. डी. काळे यांनी विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करून गरजूंना आधार दिला. लातूर शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे. कोविडसारख्या भयावह
काळात, जेव्हा संपूर्ण जग थांबले होते, तेव्हा आर. डी. काळे मात्र थांबले नाहीत. रुग्णांसाठी जेवणाचे डबे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि गरजूंना मदतीचा हात देत त्यांनी समाजाप्रती असलेली आपली तळमळ कृतीतून दाखवून दिली. या सर्व कार्याचीच पावती म्हणजे आज त्यांच्या उमेदवारीसाठी दिसणारा लोकांचा उत्साह आणि वाढती
मागणी होय. प्रभाग क्रमांक सहा (६) मधील मतदारांना ठाम विश्वास आहे की पक्ष नेतृत्व या लोकभावनेचा, या उत्साहाचा आणि या मागणीचा आदर करेल. आर. डी. काळे यांना उमेदवारी देऊन पक्ष खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आणि लोकमनाचा सन्मान करेल, अशीच अपेक्षा आज प्रभागातील जनतेतून व्यक्त होत आहे.






