Home » राष्ट्रीय » “लोकशाहीचा गळा घोटणारे सत्ताधीश, १४ दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, तरीही सरकार निमूट – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

“लोकशाहीचा गळा घोटणारे सत्ताधीश, १४ दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, तरीही सरकार निमूट – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप) – लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपली क्रूरता दाखवली आहे असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत सरकार बद्दल पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी १४ दिवसांपूर्वी जंतर-मंतरवर अनिश्चित काळाचे उपोषण सुरू केले. NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, लाखो विद्यार्थ्यांचा न्याय आणि व्यापक जनहिताच्या मुद्द्यांसाठी ते भूकेच्या यातनेत आहेत. पण सरकार? ना दखल, ना बोलणी, ना कसलीही विचारपूस

सोनम वांगचुक यांचे वजन ७-८ किलोने घटले आहे, रक्तदाब खालावला आहे आणि आरोग्याची स्थिती झपाट्याने बिघडत आहे. तरीही ‘सनकी’ सत्ताधीश शांत बसले आहेत. हा केवळ एका कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष नाही, तर संपूर्ण लोकशाहीच्या आत्म्याचा निर्लज्ज अपमान आहे.

अंजली दमानिया यांची पोस्ट
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या पोस्टमध्ये ते स्पष्टपणे म्हणतात:
“खूप अस्वस्थ वाटतंय… १४ दिवस झाले, सोनम वांगचुक उपोषणावर आहेत… पण आपल्या निर्दयी सरकारला ना त्यांच्याशी बोलण्याची तसदी घ्यायची आहे, ना त्यांच्या आंदोलनाची साधी दखल घ्यायची आहे.
इतका राग येतोय….असं वाटतंय, या सत्ताधाऱ्यांना खेचून आणून १४ दिवस उपोषणावर बसवावं. उपोषण म्हणजे काय असतं, भूक म्हणजे काय असते, शरीराची आणि मनाची तगमग काय असते, याची जाणीव तरी या संवेदनाशून्य लोकांना होईल.
लोकशाहीत सरकार जनतेचं ऐकतं. पण इथे संदेश स्पष्ट आहे – ‘तुम्ही न्याय मागा, उपोषण करा, जगा किंवा मरा… आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण सत्ता आमच्याकडे आहे…’”
अंजली दमानियांच्या या शब्दांत संपूर्ण जनतेचा राग प्रतिबिंबित होतो. हा सरकारचा दुराग्रह आहे – विद्यार्थ्यांचे भवितव्य, पेपर लीकमुळे झालेल्या आत्महत्या, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार याकडे डोळे मिटून बसणे.

सरकारचे ‘सत्तेचे अहंकार’ कधी संपणार?
सोनम वांगचुक हे लडाखच्या पर्यावरण रक्षणासाठी आणि जनहितासाठी सातत्याने लढणारे योद्धे आहेत. ‘३ इडियट्स’ चित्रपटातील रणछोडदास ‘रांचो’ च्या प्रेरणास्थान असलेल्या या माणसाला सरकारने ‘उपेक्षेची शिक्षा’ देण्याचा प्रयत्न केला आहे. पण जनता जागी आहे. २० जुलैला जंतर-मंतर ते संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे.
प्रश्न जनतेला विचारायला हवा
किती दिवस भूकबळी देऊनही सरकार कानाडोळा करणार? सोनम वांगचुक यांच्या आरोग्याला काही झाले तर याची जबाबदारी कोण घेणार? हा फक्त NEET प्रकरण नाही, हा लोकशाहीचा अपहरणाचा मुद्दा आहे!

Share This News

Related Post

National