Home » महाराष्ट्र » आमदार पुत्र परीक्षित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक; मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावर व्यक्त केला विश्वास

आमदार पुत्र परीक्षित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक; मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावर व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप) – मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे पुत्र, युवा नेते आणि क्रियेटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करणारी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

परीक्षित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अतिवृष्टीमुळे केवळ दरड कोसळल्याचा उल्लेख करत, मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्य संरचना सुरक्षित आणि भक्कम असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने यंत्रणा कामाला लावून काही तासांतच वाहतूक पूर्ववत सुरू केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचेही कौतुक केले आहे.

पुढे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमध्ये जागतिक दर्जाचा आणि अत्यंत आव्हानात्मक असा मिसिंग लिंक प्रकल्प साकार करण्याचे धाडस दाखविल्याचे नमूद केले आहे. अशा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

परीक्षित पवार यांची पोस्ट:
दरड कोसळली… Missing Link नाही !
मुंबई–पुणे Missing Link प्रकल्पाबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. परंतु अतिवृष्टीमुळे केवळ दरड कोसळली असून Missing Link ची मुख्य संरचना भक्कमपणे उभी आहे. इतकेच नव्हे, तर प्रशासनाने तातडीने यंत्रणा कामाला लावून अवघ्या काही तासांत वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू केली. हेच सक्षम नेतृत्वाचे वैशिष्ट्य असते.
सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमध्ये जागतिक दर्जाचा, अत्यंत आव्हानात्मक अशा Missing Link उभारण्याचे धाडस मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दाखवून दिले. विरोधकांनी तर आधीच यातून पळ काढला होता. कारण त्यासाठी दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि विकासाची ठाम भूमिका लागते. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राला आधुनिक पायाभूत सुविधांच्या नव्या युगात नेण्याचा जो निर्धार केला, त्यातूनच असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला.
अडचणी आल्या म्हणून विकास थांबत नाही; उलट सक्षम नेतृत्व त्या अडचणींवर मात करून जनतेचा विश्वास अधिक दृढ करते. आज विरोधक अपप्रचार करत असले तरी महाराष्ट्रातील जनता सत्य पाहत आहे, दरड कोसळली पण विकासाचा निर्धार अजिबात डळमळला नाही.
धाडसी नेतृत्व… दूरदृष्टीचा विकास… आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

Share This News

Related Post

National