Home » महाराष्ट्र » महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं ‘देखलुंगा राज’! फडणवीसांचा अहंकार चरमसीमेवर – सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं ‘देखलुंगा राज’! फडणवीसांचा अहंकार चरमसीमेवर – सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया

महाराष्ट्र खाकी (मुंबई / विवेक जगताप)  – प्रत्येक मोठ्या प्रकल्पात अफाट भ्रष्टाचाराची रेकॉर्डब्रेक लूट सुरू असताना, विरोधक किंवा सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकच ‘मंत्र’ – ‘देखलुंगा’! हाच शब्द आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला आग लावून देणारा ठरला आहे. एकेकाळी स्वतः भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात आक्रमकपणे मांडणारे फडणवीस आज सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर ‘देखलुंगा’ म्हणून मुद्दा टाळत आहेत, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर फडणवीस यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी लिहिले
अहंकार……

फक्त आणि फक्त अहंकार

मिसिंग लिंक ची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असतांना, सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना ?

प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये अफाट भ्रष्टाचार होत असतांना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देखलुंगा ‘ ? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात ‘देखलुंगा ‘.

दमानिया यांनी आणखी एका पोस्टमध्ये फडणवीस यांच्या ‘भाडे के टट्टू’ या टोमण्यावरही जोरदार टीका केली. “मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना, सगळ्यांना ‘भाडे के टट्टू’ म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी फडणवीसांच्या अहंकारी वागणुकीचा निषेध केला.
सत्तेची नशा की जबाबदारीचा विसर ?
फडणवीस यांचे हे ‘देखलुंगा’ धोरण राज्यातील जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण करत आहे. महाराष्ट्रात रस्ते, रेल्वे, वीज, पाणी अशा विविध क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांची लूट होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. मात्र, या मुद्द्यांवर चर्चा करायला बोलावले जाते तेव्हा मुख्यमंत्र्यांचा एकच प्रतिसाद – देखलुंगा.

एकेकाळी विरोधक असताना फडणवीस ज्या आक्रमकतेने भ्रष्टाचार उघड करत होते, तीच आक्रमकता सत्तेत आल्यावर पूर्णपणे गायब झाली आहे, असा टीकाकारांचा दावा आहे. “सत्ता मिळाल्यावर सगळे बदलतात, पण एवढ्या लवकर आणि एवढ्या उघडपणे?” असा सवाल आता जोर धरत आहे. सामाजिक माध्यमांवर #Dekhlunga हॅशटॅग ट्रेंड करत असून, अनेक नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक फडणवीस यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. “भ्रष्टाचार पाहणार की भागीदार होणार?” असा संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या नावाखाली चालणाऱ्या लुटीला ‘देखलुंगा’ म्हणून झाकण घालण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार कितपत यशस्वी होईल, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share This News

Related Post

National