कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम आयोजित करण्यात होता. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर –  घुगे यांनी युवा मतदारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मत हा

लोकशाहीत सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक युवा मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा. यासोबतच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी

यावेळी केले. प्रत्येक मत हे मौल्यवान असून आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचे मोल लक्षात घेवून नवमतदार, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी मतदान करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यावेळी म्हणाल्या. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे  यांनी युवकांशी

मनमोकळा संवाद आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत प्रश्नांची उत्तरे दिली, ‘कॉफी विथ कलेक्टर’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवक-युवतींशी मनमोकळा संवाद साधत त्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक मतदाराचे महत्व याबाबत माहिती दिली. तसेच निवडणूक प्रक्रिया, लोकशाही
व्यवस्था याबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध बाबींवर प्रकाश टाकला. यामध्ये युवक-युवतींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच लोकशाही आणि निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले. प्रारंभी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. तसेच डॉ. संदीपान जगदाळे यांनी मतदानाचे महत्व सांगणारा पोवाडा सादर केला.

Recent Posts