लातूर शहरातील गंधर्व मिडीयाच्या होर्डिंग मुळे लातूरकराच्या आणी गंधर्व मिडीयाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ, मनपा आणी जिल्हा प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..!

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकात थाटात (नियम भाय्य..! ) उभे केलेले लोखंडी वजनदार जाहिरात फलकामूळे गंधर्व मिडीयची तिजोरी भरली जात आहे पण या मध्ये लातूरकरांच्या जीवाशी आणी या लोखंडी वजनदार जाहिरात फालकावर बॅनर लावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ राज –  रोस पणे चालू आहे दिसून येत आहे, पण या गंभीर आणी जीवघेण्या गोष्टीकडे

मनपा आणी जिल्हाप्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे का ? देशात वेगवेगळ्या शहरात रस्त्याच्या बाजूच्या आणी रस्त्याच्या दुभाजकातील होर्डिंग पडून अनेकांचे जीवगेलेले असताना लातूर मनपा आणी जिल्हाप्रशासन गंधर्व मीडियावर गप्प काआहे ?  लातूर शहरातील रस्त्याच्या दुभाजकातील जाहिरात फलकावर (होर्डिंग) बॅनर लावण्यासाठी गंधर्व मीडियाने कर्मचारी ठेवले असतील पण त्यांच्या जीवाशी व लातूरकरांच्या

जीवाशी खेळ भर दिवसा चालू आहे असे दिसत आहे. लातूर शहरातील बार्शी रोड वरील एका जाहिरात फालकावर गंधर्व मिडीयचे कर्मचारी बॅनर लावताना दिसून आले पण त्यांच्या सुरक्षेसाठी त्या कर्मचार्यांना कसलेच सुरक्षा साधन दिसलें नाही ना डोक्यावर हेल्मेट, ना कंबरेला सेफ्टी साठी दोर असे काही नव्हते, रस्त्याच्या भर मधोमध उभे असेलेल्या या होर्डिंगवर कर्मचारी बॅनर लावत आहेत आणी खालून वाहने जात आहेत,

जर काही घटना घडली आणी एखादा कर्मचारी खाली पडला तर किती मोठा अपघात होऊ शकतो याची कल्पना, काळजी किंवा प्रशासनाची भीती गंधर्व मिडीयला नाही असे दिसत आहे म्हणूनतर हाजीवघेणा प्रकार भर दिवसा लातूर शहरात दिसत  आहे. या होर्डिंग बाबतीत काही समाजसेवक यांनी विरोध  केला म्हणून हे प्रकरण न्यायालयात चालू आहे. हे होर्डिंग  म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ आहे त्यात कर्मचारी विना सुरक्षा किट

वापरता होर्डिंग वर चडून भर दिवसा रस्त्यावर वाहने चालू असताना बॅनर बसवत आहे ही बाब मनापा आणी जिल्हा प्रशासन,  न्यायालयाच्या समोर येईल हि आशा, तरी न्यायालय, मनपा आणी जिल्हा प्रशासन या बाबतीत गंभीर दखल घेऊन गंधर्व मीडियावर कडक कारवाई करेल का ?

Recent Posts