औसा पोलीस स्टेशनचे PI सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात कत्ती व काठी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – औसा शहरातील याकतपूर मोड परिसरामध्ये धारदार कत्ती व काठी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांच्या पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात आवळल्या मुसक्या, लोकसभा निवडणूक – 2024 अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध

शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन स्तरावर अधिकारी अमलदारांचे पथक

तयार करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे. या संबंधात अधीक माहिती काढत असताना पोलीस पथकाला दि. 24 / 3/ 2024 रोजी माहिती मिळाली की औसा शहरातील याकतपूर मोड परिसरामध्ये दोन युवक हातात धारदार कत्ती व काठी घेऊन दहशत निर्माण करीत फिरत आहे.

अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने तात्काळ याकतपूर मोड परिसरात जाऊन हातात धारदार लोखंडी कत्ती व काठी घेऊन फिरणारे युवक 1) रसूल खय्युम शेख, वय 28 वर्ष, राहणार कव्हा नाका, लातूर. 2) लखन कैलास रणदिवे, वय 32 वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर. यांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक

लोखंडी धारदार कत्ती व एक काठी मिळून आली. ही कत्ती व काठी जप्त करून आरोपी युवकावर औसा पोलीस स्टेशन येथे कलम 4,25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे  व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून 135 मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अन्यबोईनवाड हे करीत आहेत. ही कामगिरी  पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार वाडकर, डीगे, हिंगणे, होगाडे, पाटील यांनी केली आहे.

Recent Posts