महाराष्ट्र खाकी ( निलंगा / विवेक जगताप ) – ती दहावी पास आहे हो त्याच्यावर टिकापण करू वाटत नाही, तीच भाजपात पिडीत आहे संभाजीन थोड तुडून खाल्ला तिकड रमेश आप्पा न थोड तुडून खाल्ले अशा टिका काँग्रेसचे नेते अभय सांळूंके यांनी आपल्या भाषणात लातूरचे खासदार आणी भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे
यांच्यावर केली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे, सर्व पक्षाचे नेते सभा घेत आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ काल निलंगा येथे सभेचे आयोजन केले होते, या सभेत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळूंके यांनी आपल्या भाषणात
लातूर खासदार सुधाकर शृंगारे आणी लातूर भाजपा मधील नेत्यावर आणी कारभारावर टिका केली आहे. अभय साळूंके म्हणाले कि मागील पाच वर्षात खासदाराला जवळून कोणीच पहिले नाही, सुधाकर शृंगारे आणी निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कटुता आली आहे असे म्हणत त्यांनी लातूर रेस्ट हाऊस
वरील एक चर्चा सांगितली ते म्हणाले कि शृंगारे यांनी मला स्वतः म्हणाले कि मला या वेळेस खासदारकीचे तिकीट नाही मिळाले तरी चालेल पण निलंगेकरांची पायरी चढणार नाही, पुढे बोलताना साळुंके म्हणाले कि शृंगारे यांच्याकडे पैसा आहे म्हूणन त्यांना उभा करत आहेत आणी थोड संभाजी पाटील निलंगेकर तोडून खात आहेत आणी
तिकडून रमेश आप्पा थोड तुडून खात आहेत, यांच यांनीच मिळवून खात आहेत आणी हे जनतेला काय देणार असा प्रश्नही विचारला आणी पुढे म्हणाले कि शृंगारेच स्वतः भाजपात एक पिडीत आहे ते काय जनतेला न्याय देतील शृंगारे यांनाच माहित नाही कि ते खासदार आहेत.