महाराष्ट्र

लातूर भाजयूमो जिल्हाध्यक्ष अँड.गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वात प्रियांक खर्गे यांच्या पुतळ्याला जोडे मारून, पुतळा जाळून तीव्र निषेध केला

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांच्या “कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काठून टाकण्यात यावे,” या विधानाचा निषेध करण्यासाठी लातूर मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा लातूर जिल्हाध्यक्ष अँड.गणेश गोमचाळे यांच्या

नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रियांक खर्गे यांच्या पुतळ्याला जोडे मारले आणि पुतळा जाळून भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी करत निषेध व्यक्त केला. लातूर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी अँड.गणेश गोमचाळे यांची

नियुक्ती झाल्यापासून लातूर मधील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यामध्ये नवी उमेद आणि नवा जोश निर्माण झाला आहे असे चित्र दिसून येत आहे. मागील काही आंदोलनामुळे जिल्हाध्यक्ष अँड.गणेश गोमचाळे यांचे राज्य पातळीवरील नेत्यांनी कौतुक केले होते, आणि आता प्रियांक खर्गे यांच्या विधानाचा निषेध म्हणून त्यांचा

पुतळ्याला जोडे मारून जाळला. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधात आज लातूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अँड.गणेश गोमचाळे यांच्या

नेतृत्वात तीव्र निदर्शन आणि आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीनं प्रियांक खर्गे यांच्या प्रतिमेला चप्पल मारून आणि पुतळा जाळुन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी हिंदुत्ववादी शिव सेना  उध्दव ठाकरे यांनी त्याची भूमिका स्पस्ट न

केल्याने उद्धव ठाकरे चा पण जाहीर निषेध केला
या वेळी प्रमुख उपस्थिती अजित पाटील कव्हेकर, दत्ता चेवले गजेंद्र बोकन, आकाश बजाज, प्रेम मोहिते, राहुल भुतडा, पांडुरंग बोडके, प्रकाश काळे, अरुण जाधव, शिधाजी पवार, अमित पोद्दार, नवनाथ ढेकरे, विजय वर्मा, जगदीश मलंग, ऋषी जाधव, यशवंत कदम, लखन

कावळे, नितीन लोखंडे, निखिल शेटकर, विनय जगते, प्रवीण सौदागर, पवन आलटे, शुभम माळवदे, हरिकेश पांचाळ, मंदार कुलकर्णी, रविशंकर लवटे, गणेश गोजमगुंडे, सागर घोडके राजेश पवार, चैतन्य फिस्के उपस्थित होते.

Most Popular

To Top