महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा येथे वार शनिवारी दि 09 रोजी सायंकाळी 7 वाजता मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जाहीर सभा होणार आहे. ही सभा निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर होणार आहे. या सभेसाठी ग्रामीण भागातील गाव ,वाडी वस्ती या ठिकाणी मराठा युवक व
समाज बांधव बैठका घेऊन सभेसाठी जास्तीत जास्त युवक महिला व जनता घेऊन येण्यासाठी नियोजन करीत आहेत, ही सभा व्यापक व ऐतिहासिक करण्याचा संकल्प करून तनमन धनाने कामाला लागले आहेत, सभेची मोठ्या प्रमाणात जागृती होण्यासाठी गावपातळीवर बॅनर ,पोस्टर आणि स्टिकर वाटप करण्यात आले आहे.
सभा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज निलंगा तालुका यांच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे. निलंगा येथील मनोज जरांगे पाटील यांची सभा निलंगा तालुक्यांमध्ये प्रथमच निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे होत असल्याने मोठ्या संख्येने मराठा
समाज बांधव उपस्थित राहणार आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आरक्षण आंदोलन आंदोलन सभा निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र महाविद्यालय येथे शनिवार दि.9 रोजी होणार आहे. या सभेमध्ये मराठा आरक्षणाची भूमिका, सरकार ला दिलेला वेळ व यानंतर समाजाने कोणती भूमिका
घेणार आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत या सभेसाठी मोठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे. या येणाऱ्या समाज बांधवांचा वाहनांसाठी निलंगा येथे सात ठिकाणा मध्ये वाहन पार्किंग सोय करण्यात येणार आहे.
ही सोय पुढील प्रमाणे ही सभा निलंगा येथील मध्यवर्ती
ठिकाण असलेल्या महाराष्ट्र महाविद्यालयात होणार असल्यामुळे वाहन स्थळ, उदगीर मोड मार्गे येणारे वाहने जिजाऊ चौकातून महाराष्ट्र महाविद्यालयाच्या पाठीमागे आदर्श विद्यालयाच्या मैदानात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मदानसुरी,गव्हाण मार्गे व नणंद मार्गे येणारी वाहने मार्केट यार्ड व जिल्हा परिषद मुलांची शाळा या
मैदानात पार्किंगची सोय करण्यात आली आहे.त्याच बरोबर महिला व लहान मुलांच्या गाड्याची पार्किंग व्यवस्था सभा मंडपाच्या बाजुला इंजिनिअरींग कॉलेजच्या मैदानात वाहन लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सभेसाठी हजारो स्वयंसेवक काम करणार आहे. यासभेसाठी महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छता गृह, ठेवण्यात
येणार आहे. येणाऱ्या सर्व मराठा समाजाला अल्पोहार जेवणाची सोय निलंगा येथील मराठा समाज व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती निलंगा तालुका सकल मराठा समाज बांधव यांनी दिली आहे.
25 बैलगाड्या महिलाच हकणार ,,,
निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 25 बैलगाड्या या सभास्थळा पर्यंत महिलाच हकणार आहेत, या बैलगाड्याची व्यवस्था तालुक्यातील मौजे उमरगा (हा) येथील शेतकऱ्यांनी केली आहे हा एक अभिनव आणि अनोखा कार्यक्रम असून महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा प्रयोग आहे.